दिंडोरीरोडवर कारच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 19:13 IST2019-03-13T19:13:30+5:302019-03-13T19:13:43+5:30
५५ वर्षीय अनोळखी इसम मंगळवारी (दि.१२) दिंडोरीरोडने पायी जात असतांना आंबेडकरनगर भागात त्यास (एमएच १५ ८४७२) या इंडिका कारने त्यास धडक दिली.

दिंडोरीरोडवर कारच्या धडकेत पादचारी ठार
ठळक मुद्देघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय अनोळखी व्यक्ती ठार झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील आंबेडकरनगर भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात इंडिका कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत हिरे (रा.आंबेडकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ५५ वर्षीय अनोळखी इसम मंगळवारी (दि.१२) दिंडोरीरोडने पायी जात असतांना आंबेडकरनगर भागात त्यास (एमएच १५ ८४७२) या इंडिका कारने त्यास धडक दिली. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. तर अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.