शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

शांतता समिती : जाळपोळ करणाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: October 11, 2016 01:10 IST

शांतता समिती : जाळपोळ करणाऱ्यांवर होणार कारवाई

नाशिक : तळेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या हिंसक घटनांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि़१०) सर्वपक्षीय नेते तसेच शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ सदरची घटना ही निंदनीय असून, ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल व कायदेशीर तपास करीत आहेत़ त्यामुळे शहरात हिंसक कारवाया, रास्ता रोको करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी बैठकीत सांगितले़
तळेगाव प्रकरणावर काही कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर रास्ता रोको, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, दगडफेक केल्याचे कृत्य हे निंदनीय आहे़ या घटनांचे लोण सर्वच ठिकाणी पसरून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले़ तसेच सोशल मीडियावर चुकीचा संदेश व अफवा पसरविण्यात आल्यामुळे यामध्ये अधिकच भर पडली़ जाळपोळीच्या घटनांची चौकशी सुरू आहे. यातील काहींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
आमदार देवयानी फरांदे यांनी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली़, तर महापौर अशोक मुर्तडक यांनी राजकीय पक्ष तसेच संघटनांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले़ मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी तरुणांना कायदा व सुव्यवस्थेसाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले़ या बैठकीस आमदार सीमा हिरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, शशिकांत जाधव, डी. जी. सूर्यवंशी, हरिश भडांगे, शिवाजी चुंभळे, संजय साबळे, कविता कर्डक, राजेंद्र बागुल, शाहू खैरे, विनायक खैरे, नाना महाले, दत्ता पाटील, पवन क्षीरसागर, अशोक दिवे, अजिंक्य साने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)