शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचा जलसंधारणमध्ये ‘पाझर’

By admin | Updated: January 9, 2016 00:01 IST

समिती सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप?

जलयुक्त शिवार योजनेचा जलसंधारणमध्ये ‘पाझर’समिती सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून जलयुक्त शिवार योजनेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीतून सीमेंट क्रॉँकीट बंधाऱ्यासह अन्य जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. अडीच कोटींच्या निधीतून सर्वाधिक निधी जलसंधारण समिती सदस्यांना वितरित करण्यात आल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ८० लाखांच्या व्याजाच्या निधीचे काही ठरावीक पदाधिकारी व सदस्यांनी आपापसात वाटून घेण्याचा प्रयत्न केला असता तो महिला सदस्यांनी एकत्र येऊन हा प्रयत्न हाणून पाडला. त्या निधीचे मागील काळात शून्य निधी वाटप झालेल्या महिला सदस्यांच्या गटात जादाचा तसेच उर्वरित निधी सर्व महिला सदस्यांमध्ये समान वाटपाचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्याचवेळी जिल्हा परिषद सेस निधीच्या वार्षिक अंदाजपत्रकांपैकी एकूण १० टक्के निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिले होते. त्यावेळी सदस्यांनी सेसच्या निधीतून असा १० टक्के निधी राखीव ठेवण्यास विरोध केला होता; मात्र विभागीय आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत प्रशासनाने हा निधी राखीव ठेवला होता. आता जलयुक्त शिवार योजनेतील निधीचे वितरण करताना जलसंधारण समितीमध्ये कार्यरत असलेल्या काही माजी पदाधिकाऱ्यांसह विद्यमान पाच सदस्यांना जादाचा निधी वितरित करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. ज्या पाच सदस्यांना जादाचा निधी वितरित करण्यात आल्याची चर्चा आहे त्यातील एका माजी पदाधिकाऱ्याने यापूर्वीही विकासकामांसाठी प्राप्त असलेला निधी अर्थपूर्ण वाटाघाटीनंतर अन्य दुसऱ्याच गटात वितरित केल्यानंतर मागे बरेच वादळ उठले होते. आताही जलसंधारण समितीच्या दोन महिला सदस्यांसह तीन जिल्हा परिषद सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)दारणा संगम येथे इसमाचा मृतदेह नाशिकरोड : चेहेडी पंपिंग दारणा संगम महादेव मंदिरासमोर दारणा नदीपात्रात गुरुवारी दुपारी एक अनोळखी ४०-५० वर्षीय इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मयत इसमाची ओळख पटली नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.