शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोल कर्मचारी मोदींना घालणार साकडे

By admin | Updated: October 21, 2015 22:40 IST

पेस्ट कंट्रोल कर्मचारी मोदींना घालणार साकडे

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला पूरक कार्य करणाऱ्या नाशिक महापालिकेकडील कंत्राटी २१२ पेस्ट कंट्रोल कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून, ऐन सणासुदीत त्यांची उपासमार होत आहे. त्यांना किमान वेतनही मिळत नसून ठेकेदार आणि पालिका मात्र त्याबाबत उदासीन आहे, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कैफियत मांडण्यासाठी हे कामगार दिल्ली येथे जाणार आहेत.महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे सव्वादोनशे कामगार गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून काम करीत आहेत. शासनाने किमान वेतन कायद्यात सुधारणा केल्यानंतरही मासिक पाच हजार ३०० रुपयांवर काम करावे लागत आहे. ठेकेदार बदलला किंवा त्याने टाळाटाळ केली तर हे वेतनही दिले जात नाही. सध्या अशाच प्रकारे ठेकेदाराने टाळाटाळ केल्याने या कामगारांना विनावेतन राहावे लागले आहे. प्रत्येक कामगाराचे कुटुंब प्रपंच आहेत. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे; परंतु ही गंभीर परिस्थती असतानाही पालिका आणि ठेकेदार मात्र हेतुत: मूग गिळून असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. ठेकेदारी पद्धत नष्ट केली आणि या कामगारांना सेवेत घेऊन पेस्ट कंट्रोलचे काम केल्यास पालिकेचे चार ते पाच कोटी रुपये वाचतील, अशी महासभेत चर्चा होऊन त्यानुसार ठरावही झाला आहे. परंतु पालिका प्रशासन ठेकेदारावर मेहेरबान असल्याने ते ठेकेदारी पद्धत बदलण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आमचे ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा प्रश्न कामगार करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.