शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

By admin | Updated: July 29, 2014 00:52 IST

शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

 नाशिक : शाही मार्गाच्या रुंदीकरणास होणारा विरोध आणि प्रत्यक्ष जागेवर असलेली स्थिती याचा विचार करता पालिकेला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करता शाही मार्गाचे अंशत: भागातच रुंदीकरण केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात येत्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.गेल्या कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी साधू-महंतांनी काढलेल्या मिरवणुकीत पंचवटीतील सरदार चौकात भाविकांची चेंगराचेंगरी झाली. त्यात २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियुक्त करण्यात आलेल्या रमणी आयोगाने साधू-महंतांच्या शाही मार्गाच्या रुंदीकरणाची शिफारस केली होती. मुळातच विकास आराखड्यात दर्शविल्यानुसार हा मार्ग रुंद करण्यात आला नव्हता. त्याचा फटका भाविकांना बसला. त्यानंतर गेली अनेक वर्षे हा विषय रखडला होता. आता काही महिन्यांपूर्वी पालिकेने रुंदीकरणाची तयारी केली. त्यासाठी भूसंपादन विभागाला कळविण्यात आले. त्याच्या नोटिसा बजावल्यानंतर मोजमाप घेण्यात आले आणि त्यानंतर गेल्या १० जुलै रोजी महापालिकेच्या स्थायी समितीवर हा विषय मांडण्यात आला होता. भूसंपादनासाठी पन्नास टक्के रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव होता. परंतु त्यावेळी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार राहुल ढिकले आणि आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी वेगवेगळ्या वेळी पाहणी केली. आता येत्या गुरुवारी (दि.३१) हा विषय समितीच्या बैठकीत मांडला जाणार असून, त्यात निर्णय घेतला जाणार आहे.कुंभमेळ्यासाठी रुंदीकरण आवश्यक असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे व्यवहार्य नाही. विशेषत: मिरवणुकीच्या परतीच्या मार्गावर अनेक ठिकाणी जुने वाडे असून, रुंदीकरणात ते मागे सरकविणे अशक्य आहे किंबहुना हे वाडे पडण्याची शक्यता अधिक असल्याने साधू-महंतांना परतीचा मार्ग बदलून देण्याची शक्यता आहे. स्नानानंतर साधू-महंतांना मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी सार्वजनिक वाचनालय किंवा कपालेश्वराजवळील जागेतून थेट शनि मंदिरकडून परत तपोवनाकडे जाता येईल, असे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)