पालक, शिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक
By Admin | Updated: March 23, 2017 21:24 IST2017-03-23T21:24:36+5:302017-03-23T21:24:50+5:30
माजी विद्यार्थी भूषण अशोक अहिरे यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचून आई-वडील व शिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक केले असल्याचे प्रतिपादन भगूर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केले.

पालक, शिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक
भगूर : येथील नूतन विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थी भूषण अशोक अहिरे यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचून आई-वडील व शिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक केले आहे. त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे प्रतिपादन भगूर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केले.
नूतन विद्यामंदिर शाळेचा माजी विद्यार्थी भूषण अहिरे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी कार्याध्यक्ष शेटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक ल. च. जोशी, शिक्षिका सुनीता आहिरे, अशोक आहिरे, शशिकांत वैद्य, मधुसूदन गायकवाड, के. डी. वाघ, कैलास सूर्यवंशी, कैलास गायकवाड, नगरसेविका संगीता पिंपळे, कैलास सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे याचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भूषण याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श घेत आपण वाटचाल करीत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संजय केकाणे व आभार वि. के. म्हैसाळे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)