डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:13 IST2025-07-22T20:13:33+5:302025-07-22T20:13:51+5:30

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.

Parents refuse to arrange dance classes nashik minor girl end his life | डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

Nashik Crime:नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी डान्स क्लास लावून न दिल्यामुळे रागाच्या भरात मुलीने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. आई वडिलांनी डान्स क्लाससाठी नकार देताच मुलीने विषारी केमिकलची बाटली तोंडाला लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पालकांनी तात्काळ तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केलं. तीन महिने तिच्यावर उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली. या घटेनमुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात हार्पिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी लगेचच डान्सचा क्लास लावावा यासाठी मुलीने हट्ट धरला होता. मात्र आई वडिलांनी लगेचच क्लासला घालण्यास नकार दिल्याने मुलीला राग अनावर झाला आणि तिने विषारी केमिकल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांनी तिला मुंबईतील के.ई. एम. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

२७ एप्रिल रोजी हा सर्व प्रकार घडला होता. तीन महिने त्या मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या संदर्भात नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. 

आई, तु ताण घेऊ नको…; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं

नाशकात पोलीस दलात अंमलदार असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या २० वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षणासाठी आईची होत असलेली ओढाताण मुलीला सहन झाली नाही. "आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझ्या शिक्षणाचा खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नको', अशी सुसाईड नोट लिहून तरुणीने घरातच मध्यरात्री गळफास लावून घेतला. वडील विभक्त राहत असल्याने कुटूंबात दोघी मायलेकी एकमेकांच्या साथीने एका छोट्याशा घरात राहत होत्या.

Web Title: Parents refuse to arrange dance classes nashik minor girl end his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.