नाशिक : शहरात कोठे दुचाकी, तर कोठे तीनचाकी वाहने पेटवून दिली जातात, तर कोठे सर्रासपणे धारदार शस्त्रे नाचविली जातात तर काही भागात गावगुंड लोखंडी गज हातात घेऊन दहशत माजवत रहिवाशांच्या वाहनांची दगडफेक करून नुकसान करत असल्याच्या घटना राजरोसपणे घडत असल्याने नाशिककरांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. उपनगर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या वाहनांवरील दगडफेकीच्या घटनेविषयी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या गस्तीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.जेलरोडवरील नारायणबापूनगर सोसायटीत शनिवारी (दि.९) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गावगुंडांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या रात्रीच्या गस्तपथकाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालत रहिवाशांना वेठीस धरले. सर्रासपणे दगडफेक करून व लोखंडी गज फिरवून तीन चारचाकी, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या गस्तीविषयी संशय व संताप रहिवाशांमधून व्यक्त होत आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे; मात्र यामधून नेमके काय निष्पन्न होणार सर्वसामान्यांच्या वाहनांचे नुकसान भरून येणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. रहिवाशांनी याप्रकरणी नगरसेवक प्रशांत दिवे यांची भेट घेऊन गा-हाणे मांडले असून, दिवे यांनी याप्रकरणी संशयित समाजकंटकांवर कारवाईची मागणी उपआयुक्त अमोल तांबे यांची भेट घेऊन केली. उपनगर, नाशिकोड पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात टवाळखोर, गावगुंड, समाजकंटकांची भाईगिरी वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सोमवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन रहिवाशांचे शिष्टमंडळ याबाबत निवेदन सादर करणार आहे.टोळी ताब्यात; तोरणे सराईतचौघा समाजकंटकांनी नारायणबापू सोसायटीतील तीन दुचाकींचे नुकसान केले. नॅनो, इंडिका, क्वालिस या वाहनांच्या काचा फोडल्या. यानंतर आरडओरड, शिवीगाळ करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परिसरातील रहिवाशी जमा झाल्यानंतर चौघांनी पळ काढला. घटनेची माहिती नागरिकांनी उपनगर पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी (उशीरा) पोहचले. पोलिसांनी रेल्वेस्थानकातून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत उर्वरित त्याच्या तीघा साथीदारांनाही बेड्या ठोकल्या आहे. संशियतांपैकी सचिन तोरणेविरु ध्द या आधीही गुन्हे दाखल असून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला आहे. मद्यपान करु न दहशत निर्माण करणे हा या टोळीचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
दहशत : नाशिकमध्ये गावगुंडांच्या टोळीचा हैदोस; सहा वाहने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 19:12 IST
जेलरोडवरील नारायणबापूनगर सोसायटीत शनिवारी (दि.९) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गावगुंडांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या रात्रीच्या गस्तपथकाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालत रहिवाशांना वेठीस धरले.
दहशत : नाशिकमध्ये गावगुंडांच्या टोळीचा हैदोस; सहा वाहने फोडली
ठळक मुद्देचारचाकी, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत आपली दहशत माजविण्याचा प्रयत्ननांगरे-पाटील यांची भेट घेऊन रहिवाशि निवेदन सादर करणार