पंचवटीत धोकेदायक इमारती ‘जैसे थे’

By Admin | Updated: August 5, 2014 01:51 IST2014-08-05T01:35:24+5:302014-08-05T01:51:43+5:30

पंचवटीत धोकेदायक इमारती ‘जैसे थे’

Panchavati was like 'dangerous' buildings | पंचवटीत धोकेदायक इमारती ‘जैसे थे’

पंचवटीत धोकेदायक इमारती ‘जैसे थे’

 

पंचवटी : परिसरातील धोकेदायक इमारती, तसेच वाडे यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी धोकेदायक घरांना नोटिसा बजावल्या; मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या या नोटिसांची कोणतीही दखल न घेता केराची टोपली दाखविली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकेदायक वाडे, तसेच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नोटिसा बजावण्याचे काम केले जाते. यावर्षीही नगररचना विभागाने नोटिसा बजावल्या. पंचवटीत जवळपास शंभर नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीची नागरिकांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे पडके वाडे तसेच जुन्या इमारती आणखी धोकेदायक बनल्या आहेत. पावसाळ्यात जुनी घरे कोसळण्याच्या घटना सर्वाधिक पंचवटी परिसरात घडतात. सध्या पावसाळा सुरू असून, पंचवटीत अनेक जुने व धोकेदायक वाडे आहेत. जोराचा पाऊस झाल्यास धोकेदायक घरे कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी संबंधित नागरिकांकडून दखल घेतली जात नसल्याने घडणाऱ्या घटनेस प्रशासन की जुन्या वाड्यातील नागरिक जबाबदार राहणार, असा सवाल केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Panchavati was like 'dangerous' buildings