वणी : सकाळी, सायंकाळी व रात्रीच्या सुमारास थंडीचे वातावरण असल्याने मार्च महिन्यात डिसेंबर महिन्याच्या थंडीचा अनुभव येत आहे, मात्र बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. ...
नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालकास नाशिकच्या दोघांनी तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. रुग्णालय आणि मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे भासवून संस्थाचालकांचा वेळोवेळी विश्वास संपादन करून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्र ...
नाशिक- येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने राज्यभरातील महापालिकांबरोबरच अनेक निमशासकिय संस्थांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यावर आता बराच खल होणार असला तरी मुळातच अशाप्रकारचे खासगी बॅँकांमध्ये ते किती सुरक्षीत याचा विचार सरकारने केला ना संबंधीत संस् ...
देवळा : येथील देवळा-नाशिक रस्त्यावर समृद्धी पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी (दि.६) रात्री दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील युवक अभय नंदकिशोर रौंदळ (वय २३) याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. नुकताच नोकरीला लागलेल्या कर्त ...
मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ...
नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्य ...
दिंडोरी : ‘बेटी बढाव बेटी बचाव’चे कितीही नारे देत असले तरी अजूनही स्त्री जन्माला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नकोशीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्या ...
मालेगाव : कॅम्प रोडवर असलेल्या बंगल्याच्या बनावट चाव्या तयार करून पाच लाख २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या कमलनाथ श्रावण सूर्यवंशी (४५) रा.द्याने याला छावणी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. शंतनू जयंत पवार यांनी फिर्याद दिली. ...
गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी होत असलेली लॉबींग व चढाओढ पाहता, रूग्णसेवा करण्याची खरोखरच किती उमाळा या मंडळींमध्ये ...