नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:17 PM2020-03-19T22:17:36+5:302020-03-20T00:07:33+5:30

गेल्या २०१३-१४ मध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारलेले नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल अक्षरश: धूळ खात पडले आहे. काटेरी झुडपांनी वेढलेले आणि तळीरामांचा अड्डा बनलेल्या या संकुलाची बुधवारी (दि. १८) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

Taluka sports complex in Nampur used to eat dust | नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल धूळ खात

नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुलाची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे व महेश पाटील आदी.

Next
ठळक मुद्देसटाणा : सक्षम संस्थेकडे हस्तांतरित करून तत्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना

सटाणा : गेल्या २०१३-१४ मध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारलेले नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल अक्षरश: धूळ खात पडले आहे. काटेरी झुडपांनी वेढलेले आणि तळीरामांचा अड्डा बनलेल्या या संकुलाची बुधवारी (दि. १८) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
क्र ीडा संकुलाची तत्काळ दुरु स्ती करून देखभालीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सक्षम संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना आमदारांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील नामपूर गावालगत असलेले क्रीडा संकुलाची अवस्था उद्घाटनाआधीच अक्षरश: कचराकुंडीसारखी झाली आहे. याबाबत आमदार बोरसे, तहसीलदार इंगळे-पाटील यांनी दुपारी बुधवारी क्रीडा संकुलाची पाहणी केली. संपूर्ण क्रीडा संकुलच काटेरी झुडपांनी वेढलेले आढळून तसेच शौचालयांची तोडफोड, दारूच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेले प्रवेशद्वार अशा अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. ही संकुलाची दुरवस्था पाहून आमदार बोरसे यांनी तत्काळ तालुका क्रीडा अधिकारी महेश ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र रौंदळ, गटविकास अधिकाऱ्यांना बोलावून यावेळी या सर्व गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, आमदार बोरसे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात नामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पवार, हिरे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा दप्तरे, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. योगेश पगार, डॉ. नितीन कोर, प्रा. जी. के. कापडणीस, अण्णासाहेब सावंत, अशोक सावंत, कविता सावंत, पूनम कोकणे, जयश्री सावंत, करुणा अलई, बाळासाहेब भदाणे तसेच अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन क्रीडा संकुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

क्र ीडा संकुल कार्यान्वित करा...
आमदार बोरसे यांनी क्र ीडा संकुलाच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून क्र ीडा संकुलाची उर्वरित कामे पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी क्र ीडा साहित्य उपलब्ध करून खेळाडूंसाठी खुले करण्याच्या सूचना दिल्या. क्र ीडा संकुलाची देखभाल होऊन चांगले खेळाडू कसे तयार होतील यासाठी नामपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि डॉक्टर असोसिएशनने समन्वय साधून निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

क्र ीडा अधिकारी कार्यालयांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात क्र ीडा संकुलांची दुरवस्था झाली आहे. नामपूर येथील क्र ीडा संकुलाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी हस्तांतरण प्रक्रि या अद्याप झालेली नाही. मानधन तत्त्वावार क्रीडा मार्गदर्शक, शिपाई यांची नेमणूक केली जाईल. जवळच असलेल्या नामपूर महाविद्यालयाने क्रीडा संकुलाचे पालकत्व घ्यावे.
- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार
आजची तरु ण पिढी सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान आहे. येथील भग्नावस्थेत असलेल्या क्र ीडा संकुलामुळे मन विषण्ण होते. तालुकास्तरीय शालेय व महाविद्यालयीन क्र ीडा स्पर्धा संकुलात घेतल्या जाव्यात. क्र ीडा अधिकाºयांनी तातडीने क्र ीडा संकुल सुरू करावे.
- नारायण सावंत,
सामाजिक कार्यकर्ते
 

Web Title: Taluka sports complex in Nampur used to eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार