कळवण : मानूर येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कळवण तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...
मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे. ...
नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माह ...
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आ ...
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे. ...
लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत, कोणती विकासकामे हाती घेण्यात येऊन ती पूर्णत्वास न्यायची आहेत, याचे सूक्ष्म नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व संबंधित कामे शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच व ...
वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले. ...
सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले. ...
देवगाव : अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास भारतभर १५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून देवगाव येथेही शनिवारी (दि. २३) श्रीराम मंदिरात महंत जनेश्वरानंदगिरी महाराज (भारतमाता आश्रम, बोकडदरे), ज्ञानेश्वर महाराज शिंदे (साधना ...
सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...