महालखेड्यात दीड एकर ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 09:08 PM2021-01-25T21:08:12+5:302021-01-26T02:19:10+5:30

मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

One and a half acre of sugarcane burnt in Mahalkheda | महालखेड्यात दीड एकर ऊस भस्मसात

महालखेड्यात दीड एकर ऊस भस्मसात

Next
ठळक मुद्देजवळील पाण्याच्या मोटरी सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न

मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

येवला तालुक्यातील महालखेडा येथे रविवारी भाऊसाहेब मनोहर भगत या शेतकऱ्याच्या दीड एकर उसाला अचानक आग लागली. यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ जवळील पाण्याच्या मोटरी सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझेपर्यंत ५० टक्के ऊस जळून खाक झाला होता. येवला तालुक्‍यात आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अद्याप हिवाळा असूनसुद्धा आग लागल्याच्या घटना वाढत असल्याची माहिती येवला अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: One and a half acre of sugarcane burnt in Mahalkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.