Shriram Temple in Ayodhya; Fundraising begins | अयोध्येत श्रीराम मंदिर; निधी संकलनास सुरुवात

अयोध्येत श्रीराम मंदिर; निधी संकलनास सुरुवात

ठळक मुद्दे भव्य श्रीराम मंदिरास आपला हातभार लागावा हा निधी संकलनामागचा हेतू

देवगाव : अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास भारतभर १५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून देवगाव येथेही शनिवारी (दि. २३) श्रीराम मंदिरात महंत जनेश्वरानंदगिरी महाराज (भारतमाता आश्रम, बोकडदरे), ज्ञानेश्वर महाराज शिंदे (साधना आश्रम, रूई) यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी संकलन अभियानास सुरुवात करण्यात आली.

देशातील प्रत्येक गावामध्ये व शहरामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या अभियानात प्रत्येक घरातून स्वेच्छेने केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. साकारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरास आपला हातभार लागावा हा निधी संकलनामागचा हेतू आहे. संकलित झालेला निधी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत अयोध्येत पाठवला जाणार आहे.
देवगाव येथेही शनिवारी निधी संकलन अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ३० ते ३५ घरांतून निधी संकलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाधान कापसे, संतोष आरोटे, किरण कुलकर्णी, विनोद जोशी, संतोष हुजबंद, पो. पा. सुनील बोचरे, भागवत बोचरे, संतोष चव्हाण, सोमनाथ मेमाने, सतीश लोहारकर, धनंजय जोशी, सोमनाथ निलख, निखिल चव्हाण, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Shriram Temple in Ayodhya; Fundraising begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.