नगरविकासमंत्र्यांना विकासकामांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 06:29 PM2021-01-25T18:29:17+5:302021-01-25T18:30:51+5:30

सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Statement of development works to the Urban Development Minister | नगरविकासमंत्र्यांना विकासकामांचे निवेदन

सुरगाणा येथील विकासकामांना मंजुरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन ‌‌‌‌‌‌एकनाथ शिंदे यांना देताना मोहन गांगुर्डे, भरत वाघमारे, सचिन आहेर. एकनाथ भोये, ईश्वर थोरात, दिनेश वाघ. 

Next
ठळक मुद्देसुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सुरगाणा शहरातील अंदाजे अठरा कोटी रुपये खर्च असलेल्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात यावी यासाठी येथील सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील नवीन पाणीपुरवठा व पाईपलाईन करणे, नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करणे, व्यापारी संकुल बांधकाम करणे, नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे,
शहरातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करणे, भुयारी गटार बांधकाम करणे, दुर्गादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, आदिवासी समाज स्मशानभूमीला संरक्षक भिंत व निवाराशेड बांधणे इत्यादी विकासकामांचा तपशील आहे. त्यानुसार संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, नगरसेवक भारत वाघमारे, सचिन आहेर, शहरप्रमुख एकनाथ भोये, ईश्वर थोरात, दिनेश वाघ आदी उपस्थित होते.

Web Title: Statement of development works to the Urban Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.