पाडवा पहाट कार्यक्रम

By Admin | Updated: October 19, 2014 16:49 IST2014-10-19T00:45:07+5:302014-10-19T16:49:08+5:30

पाडवा पहाट कार्यक्रम

Padwa Dawa Program | पाडवा पहाट कार्यक्रम

पाडवा पहाट कार्यक्रम


इंदिरानगर : राजीवनगर येथील युनिक ग्रुपतर्फे पाडवा पहाट कार्यक्रम होत आहे. गायक संगीतकार संजय बानुबाकोडे प्रस्तुत ‘जिव्हाळ्याची गाणी’ हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २४ रोजी पहाटे ५.३० वाजता भगवती चौक, राजीवनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला दूरचित्रवाणी मालिका ‘जुळून येती रेशीम गाठी’ फेम प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी केले आहे.
वडाळा-डीजीपीनगर रस्ता अंधारात
वडाळागाव : वडाळा चौफुलीपासून ते थेट विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंत सावता माळी कॅनॉल रस्त्यावरील पथदीप गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद पडले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. रस्त्याला विविध ठिकाणी अपघाती वळणे असल्यामुळे लहान-मोठ्या अपघातांची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक-पुणे व मुंबई महामार्गांना वडाळागावमार्गे जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने दिवसा व रात्रीदेखील या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे सदर रस्त्यावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्यावर नवीन पथदीप बसविण्यात आले; मात्र चार ते पाच दिवसांपासून या पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे पथदीप रात्रीच्या वेळी बंद राहत असल्याने संपूर्ण रस्त्यावर अंधार पसरत आहे.
 

Web Title: Padwa Dawa Program