शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव जगदंबा यात्रेच्या तयारीला वेग

By admin | Updated: September 29, 2016 01:18 IST

येवला : तीन हजार भाविक बसणार घटी

येवला : तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या कोटमगाव स्थित माता जगदंबेच्या नवरात्र यात्रा उत्सवाच्या तयारीला वेग आला असून श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तर्फे जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. १ आॅक्टोबर रोजी घट स्थापना होणार असून कोटमगाव यात्रा उत्सवास सुरवात होणार आहे. घटस्थापना ते दसरा असे एकूण ९ दिवस कोटमगाव येथे दरवर्षी भरते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदा सुमारे ३ हजार भाविक नऊ दिवस घटी बसणार आहेत. तीन वर्षापासून रखडलेला उड्डाण पूल यंदा मोटरसायकल, रिक्षा व पादचारी यांचेसाठी खुला होणार असल्याने भाविकांना वळसा घालून जाण्याची गरज नाही. त्यामुळे या वर्षी गर्दी वाढणार असल्याची चिन्हे आहे. मात्र चार चाकी व मोठ्या वाहनांसाठी भाविकांना नागडे बायपास किंवा नांदेसर बायपास ने वळसा घालून कोटमगाव येथे दर्शनासाठी जावे लागणार आहे. नियंत्रणासाठी प्रशासनाची २६ सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर राहणार आहे. यात्रोत्सवासाठी १०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी कोटमगाव येथील यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ व विविध खात्याचे अधिकारी यांची बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने कोटमगाव येथे रुग्णवाहिका, डॉक्टर, आणि अपंगांसाठी कुबड्या देणे, सामाजिक उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या. देवस्थान विश्वस्तांनी त्या मान्य केल्या. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. पोलिसांच्या वतीने यात्रोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. यात्रा परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय काटेकोर पद्धतीने नियोजन केले असून खेळणी, सौदर्य प्रसाधनाची दुकाने संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस व हॉटेल व्यावसायिकाना संरक्षक भिंतीच्या बाहेर जागा देण्यात आली आहे. सोयी सुविधामुळे यात्रोत्सवाला नवीन रूप मिळाले असून परिसरात संपूर्ण काँक्र ीटिकरन, मंदिरालगत प्रवेशद्वार, सभामंडप, स्वतंत्र भक्तनिवास, पेव्हर ब्लॉक, पाण्याची टाकी, स्त्रीयांसाठी शौचालयाची कामे पूर्णत्वास गेली आहे. यासह ग्रामपंचायत व जगदंबा माता ट्रस्टने आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ सिस्टीम बसविला आहे. येवला ते कोटमगाव दरम्यान येवला नगरपालिका पथदीपाची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)सप्तशृंगगडावर नियोजन पूर्णवणी : सप्तशृंगगडावरील शारदीय नवरात्र उत्सवासाठी न्यास विश्वस्तानी नियोजनावर अखेरचा हात फिरविला असुन घटस्थापना दि १ आॅक्टोबर रोजी जिल्हा न्यायाधीश अरूण ढवळे यांचे हस्ते यथासांग पूजाविधिने संपन्न होणार आहे. ८ फुट उंचीची मूर्ती असलेल्या सप्तशृंगीला ११ वाराची विशेष पैठणी तसेच ३ मीटर चोळीचा पेहराव करण्यात येणार आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट, कमरपटा, तोडे, कोयरी हार, गुलाबी हार, गाठले, मयुर हार, पुतळी हार, वजरटिक अशा सुवर्ण अलंकारांनी भगवतीला सुशोभीत करण्यात येणार आहे विशेष पंचामृत महापुजा प्रात आरती मध्यान्ह आरती व सायं आरती करण्यात येणार आहे. फुलांचे सुशोभिकरण व विशेष सजावटीचा फुलांचा हार भगवतीची शोभा वाढविणार आहे. घटस्थापना पूजाविधीस उपस्थीती मोठ्या प्रमाणावर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.