ओझरच्या एच ए एल हायस्कूलचा ५१ वा क्रीडा महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 03:29 PM2021-01-29T15:29:28+5:302021-01-29T15:30:29+5:30

ओझरटाऊनशीप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक ५१ वा क्रीडा महोत्सव यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.

Ozar's HAL High School's 51st Sports Festival in full swing | ओझरच्या एच ए एल हायस्कूलचा ५१ वा क्रीडा महोत्सव उत्साहात

ओझरच्या एच ए एल हायस्कूलचा ५१ वा क्रीडा महोत्सव उत्साहात

Next

सुमारे ५० वर्षापासून येथील एच. ए. एल.च्या स्टेडियमवर संस्थेचे सचिव डॉ. मो. स.गोसावी यांच्या उपस्थितीत सलग साजरा होणाऱ्या क्रीडा दिवसाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा बंद असतानाही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय प्राचार्य के. एन. पाटील यांनी घेतला. या स्पर्धेसाठी सूर्यनमस्कार, योगासने व दोरी उड्या या तीन क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली होती. या तिन्ही प्रकारातील स्पर्धेची पहिली फेरी ऑनलाईन झाली. यात पाचवी ते बारावीच्या २६४ विद्यार्थ्यांनी घरुनच मोबाईलद्वारे ऑनलाईन सहभाग नोंदविला.अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या मोजक्याच स्पर्धकांच्या उपस्थितीत हा क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानावर संस्थेचे ओझर विभागाचे अधिक्षक डॉ. एस. आर. खंडेलवाल, प्राचार्य पाटील, उपप्राचार्य एस. ई. पगारे ,उपप्राचार्य आर. एम.चौधरी, पर्यवेक्षक देवरे, शेवाळे, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी दीपक पाटील व कदम यांच्या उपस्थितीत साजरा झाला.संस्थेच्या नाशिक विभागाचे झोनल सेक्रेटरी डॉ. राम कुलकर्णी, डॉ. दिप्ती देशपांडे , सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी स्पर्धक व पालकांना मार्गदर्शन केले.

Web Title: Ozar's HAL High School's 51st Sports Festival in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.