ओझरला विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:40 IST2020-12-23T17:39:47+5:302020-12-23T17:40:57+5:30
ओझर टाऊनशिप : शेतातील इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ओझर येथे मंगळवारी (दि.२२) दुपारी घडली.

ओझरला विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
सुधीर गोंविद चौधरी (४६, रा. सायखेडा फाटा, ओझर) हे त्यांच्या शेतात असलेली इलेक्ट्रिक मोटर सुरु करण्यास गेले होते. त्यांना शॉक लागल्याने ते जोरात दूरवर फेकले गेले. ते दगडावर आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ओझर पोलिसांना वृत्त समजताच उपनिरीक्षक यू. डी. अहिरे व सहायक उपनिरीक्षक विजय गायकवाड, अनिल काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठविला. याबाबत ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी.आर. बैरागी करीत आहेत.