मालेगावी प्लास्टीक कचऱ्यात जैविक कचरा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:09 IST2020-07-10T20:43:01+5:302020-07-11T00:09:48+5:30
मालेगाव मध्य : शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच बाहेरून येणाºया प्लास्टिक कचºयासोबत जैविक कचरा येण्याची भीती वाढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. एके ठिकाणी प्लास्टीक कचºयात रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून वापरण्यात आलेले मास्क आणि हातमोजे आढळून आल्याने हे संकट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मालेगावी प्लास्टीक कचऱ्यात जैविक कचरा?
मालेगाव मध्य : शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच बाहेरून येणाºया प्लास्टिक कचºयासोबत जैविक कचरा येण्याची भीती वाढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. एके ठिकाणी प्लास्टीक कचºयात रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून वापरण्यात आलेले मास्क आणि हातमोजे आढळून आल्याने हे संकट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चार महिन्यापूर्वी हरीत लवादाचा झटका बसल्याने काही महिन्यांपासून प्लास्टीक कारखाने बंद स्थितीत होते. गत काही दिवसांपासून पुन्हा शहरात मुंबई, सुरत, पुणेसह राज्यातून प्लास्टीक कचरा येण्यास प्रारंभ झाला आहे.
१ या प्लास्टीक कचºयासोबत वैद्यकीय जैविक कचरा येण्याची शक्यता वाढली आहे. या घातक प्लास्टीकपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गांभीर्याने घेत गेल्या आठवड्यात दोन जणांवर गुन्हे दाखल करीत ट्रक जप्त केले; तरीही प्लास्टीक वाहतूक सर्रास सुरू आहे. ही शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा समजली जात आहे. यामुळे पुन्हा शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२ हरित लवादाच्या दणक्याने विद्युत वितरण कंपनीने प्लास्टीक कारखान्यांची वीज जोडणी कायम स्वरूपी खंडित केली होती. वीज जोडणी शिवाय कारखाने सुरू होणे शक्य नाही, असे असतानाही शहरालगत महामार्गावरुन रात्री जाताना प्लास्टीकच्या कारखान्यांची दुर्गंधी येत आहे. अशावेळी वीज जोडणी अभावीही कारखाने सुरू कसे झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.