शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शेतजमीन मूळ मालकाला परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:30 AM

देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार आहे.

ठळक मुद्देदेवळा मुद्रांक घोटाळा : बनावट दस्ताच्या माध्यमातून फसवणूक

देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार आहे.तिसगाव येथील भास्कर धर्मा निकम ह्या शेतकऱ्याची मेशी शिवारातील वडिलोपार्जीत शेतजमीन मिळकत नं ४००/१ (क्षेत्र - ३ हेक्टर ७०.आर ) बनावट दस्तऐवज तयार करुन घेवून बापू वाघ यांच्या नावे करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात भास्कर निकम यांचे वडील धर्मा त्र्यंबक निकम यांचे निधन झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीवर वारस नोंद लावण्यासाठी मेशी येथील तलाठी कार्यालयात गेले असता एका खरेदी खताच्या दस्तान्वये वडिलांच्या मिळकतीवर बापू वाघ ह्या व्यक्तीची महसूल दप्तरी मालकी हक्काची नोंद लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.

सन २०१२ मध्ये त्यांच्या शेत जमीनीची विक्री झाल्याचे समोर आलेल्या दस्तऐवजा वरून दिसून आले. हया संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. ५ ) दिलेल्या आदेशात सदर मेशी येथील मिळकतीचा ( गट नं. ४ङ्म० / १ ) दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेखात नोंदणी झाल्याचा कोठेही उल्लेख येत नाही. यावरून सदर दस्त हा बनावट असल्याचे सिद्ध होत असल्याने रद्द होण्यास पात्र असून शेतजमीनीची खरेदी रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्याचा आदेश दिला आहे.माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन माझी जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला, परंतु माध्यमांनी या विषयाला वाचा फोडली. माझी हडप झालेली जमीन मला पुन्हा परत मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. ह्या प्रकरणातील दोषींना कडक शासन मिळावे.- भास्कर धर्मा निकम, शेतकरी, तिसगाव. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे