शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी

By admin | Updated: January 14, 2017 00:37 IST

जिल्हा परिषद : अर्धा डझन आजी-माजी आमदारांत रंगणार सामना

 नाशिक : दोन-अडीच वर्षांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. किमान अर्धा डझनभर आजी-माजी आमदारांमध्ये यानिमित्ताने प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आमदार माणिकराव कोकाटे यांना राजाभाऊ वाजे यांनी पराभूत करीत आमदारकी मिळविली होती. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीतही राजाभाऊ वाजे यांनी नगराध्यक्षपदासह शिवसेनेला बहुमत मिळवित कोकोटे यांना दुसऱ्यांदा झटका दिला. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोकाटेंविरुद्ध वाजे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कोकाटे यांना विधानसभा आणि नगरपंचायतींतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. इगतपुरी मतदारसंघातूनही आमदार निर्मला गावित यांनी माजी आमदार शिवराम झोले व काशीनाथ मेंगाळ यांना पराभवाची धूळ चारली आहे. आता दोन्ही माजी आमदार शिवसेनेत असल्याने त्यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चंग बांधला आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातही माजी आमदार शिरीषकुमार कोतवालविरुद्ध माजी जि. प.सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यात सामना रंगला. त्यात कोतवाल - कुंभार्डे पराभूत होऊन डॉ. राहुल अहेर यांना विजयाची संधी लाभली. दरम्यान, कुंभार्डे यांनी भाजपात प्रवेश करून नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत नगराध्यक्षपदी भाजपाचे भूषण कासलीवाल यांची वर्णी लावली. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा तळेगाव-रोही गटातून कोतवाल-कुंभार्डे यांचा सामना रंगणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार धनराज महाले यांना पराभूत करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा आमदारकी मिळविली. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त्याने माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर यांना आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. नांदगावमध्येही आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार अ‍ॅड. अनिलकुमार अहेर यांना विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचा आधार घेता येईल.
(प्रतिनिधी)