शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

असेल आमदारांची मर्जी, तरच तिकिटामध्ये सरशी!

By admin | Updated: December 31, 2016 22:44 IST

सेना-भाजपात चढाओढ : इच्छुकांमध्ये घालमेल, हालचाली गतिमान

नाशिक : येत्या महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडे चलनी नाणे म्हणून पाहिले जात असल्याने इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परंतु, तिकीट वाटपात दोन्ही पक्षांत आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी आमदारांभोवती वर्दळ वाढत चालली आहे. आमदारांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांची यादीही तयार करून ठेवली असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या सेना-भाजपात बघायला मिळणार आहे. शहरात भाजपाचे तीन व सेनेचा एक आमदार आहे. तसेच विद्यमान नगरसेवक व देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल अहेर आणि भाजपात दाखल झालेले आमदार अपूर्व हिरे यांचेही शहरात कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे. त्यात भाजपाच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे आहेत. त्यामुळे सानप हेच तिकीट वाटपाचे मुख्य केंद्र असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपात सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात शहराध्यक्ष सानप यांची मोठी कसोटी लागणार आहे. सानप यांच्या मर्जीतील अनेक इच्छुकांनी उमेदवारी निश्चित मानून प्रभागात प्रत्यक्ष तयारीही सुरू केली आहे. सानप यांच्याबरोबरच भाजपाचे अन्य आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल अहेर व अपूर्व हिरे यांच्याकडेही इच्छुकांचा राबता सुरू झाला आहे. सानप हे शहराध्यक्ष असल्याने तिकीट वाटपात वरचढ ठरतील. परंतु, सानप यांना अन्य आमदारांनाही विश्वासात घ्यावे लागणार असल्याने उमेदवारांच्या यादीत फरांदे-हिरे-अहेर यांच्याही मर्जीतील इच्छुकांची भर पडणार आहे. भाजपाच्या पाचही आमदारांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांची यादी तयार केल्याचे वृत्त असून त्यानुसार, काही इच्छुकांना प्रत्यक्ष कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, काही प्रभागात आमदारांनी शब्द दिल्याचे सांगत कामाला सुरुवात करणाऱ्या इच्छुकांविरुद्ध तक्रारींचाही सूर पक्ष कार्यालयात ऐकायला मिळू लागला आहे. त्यामुळे, तिकीट वाटपाप्रसंगी भाजपात कलह वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाजपात पाचही आमदारांचा दबदबा राहणार असतानाच शिवसेनेतही नाशिकरोड-देवळाली मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप व माजी आमदार बबन घोलप यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रामुख्याने, नाशिकरोड विभागातील उमेदवारी वाटपात घोलप यांचाच वरचष्मा राहणार असल्याचे बोलले जात आहे.