केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर

By Admin | Updated: December 29, 2014 01:22 IST2014-12-29T01:21:05+5:302014-12-29T01:22:14+5:30

केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर

Only 31 tradesmen appear before the committee for actual objection | केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर

केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच प्रत्यक्ष हरकतीसाठी समितीसमोर हजर


नाशिक : शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी दोन हजार वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या १३४ हरकतदारांपैकी केवळ ३१ वृक्षप्रेमींनीच समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपल्या हरकती नोंदविल्या आहेत़ शनिवारी १९, तर रविवारी १२ वृक्षप्रेमींनी समितीसमोर आपल्या हरकती नोंदविल्या़ दरम्यान, या समितीसमोर सादर केलेल्या या हरकती २९ जानेवारी २०१५ रोजी न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहेत़ शहरात रस्ता रुंदीकरणासाठी दोन हजार चारशे वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या १३४ हरकतींवर शनिवारपासून महापालिकेत सुनावणी सुरू झाली. मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील तसेच डॉ. संदीप जाधव आणि डॉ. दिगंबर मोकाट यांनी सुनावणी घेतली. यावेळी वृक्षप्रेमींनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये यापैकी सुमारे १८०० झाडे वाचवू शकतो असे काहींनी सांगितले, तर काहींनी तोडलेल्या झाडांचे योग्यरितीने पुनर्रोपण करण्याची मागणी केली़
रस्त्याच्या कडेला फुटपाथ दिसून येत नाही, वाहतुकीसाठी समांतर रस्ते तयार करण्यात यावेत, कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही. तसेच एक झाड तोडल्यास त्याबदल्यात किमान दहा झाडे लावण्यात यावी. २००६ मध्ये ४ हजार ३०० झाडे तोडण्यात आली, मात्र त्याबदल्यात झाडे लावण्यात आलेली नाही़ वृक्षांची गणना, संयुक्त सर्वेक्षण करणे, महापालिकेची वृक्ष प्राधीकरण समिती अर्धवट असून, अल्पसंख्याक नगरसेवक सदस्यांनी बहुमत असलेल्या अशासकीय सदस्यांना हटवले त्यामुळे समितीची आधी पुनर्रचना करा, किमान पदवीधर सदस्यांची नियुक्ती करा, अशा सूचनाही करण्यात आल्या.

Web Title: Only 31 tradesmen appear before the committee for actual objection