शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात फक्त १८० कोटी शिल्लक

By admin | Updated: January 3, 2017 00:56 IST

एटीएम बंदच : नोटाबंदीच्या झळा कायम; अन्य बॅँकांमध्ये ५००च्या नोटांचा तुटवडा

नाशिक : स्टेट बॅँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांना पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे एटीएम पैशांअभावी बंद पडले असून, सामान्यांना नोटाबंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुसरीकडे स्टेट बॅँकेकडे फक्त १३६ कोटी रुपये व अन्य बॅँकांकडे ५० कोटी रुपये नवीन वर्षात शिल्लक आहेत. रिझर्व्ह बॅँकेकडून नव्याने पैसे कधी मिळतील याचा नेम नसल्याने १८० कोटींवरच जिल्ह्याचा आर्थिक गाडा हाकावा लागणार आहे.  केंद्र सरकारने एटीएममधून साडेचार हजार रुपये काढण्याची मुभा दिली असली तरी, स्टेट बॅँक वगळता अन्य बॅँकांकडे पुरेसे पैसेच शिल्लक नसल्याने त्यांच्याकडून सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव नाशिककर नागरिक घेत आहेत.  जिल्ह्यात फक्त स्टेट बॅँकेचेच एटीएम खऱ्या अर्थाने सेवा देत असून, अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांचे पन्नास टक्के एटीएम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यातील ३० टक्के एटीएम दिवसातून एक तासच कार्यरत असल्याचे वास्तव आहे. यामागे पैशांची कमतरता असे कारण आहे.  स्टेट बॅँकेकडे १३६ कोटी शिल्लक आहेत तर अन्य बॅँकांकडे ५० कोटींच्या आसपास रक्कम आहे. स्टेट बॅँकेकडील १३६ कोटींमध्ये ६० कोटींच्या नोटा पाचशेच्या आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे मिळणार असले तरी अन्य बॅँकांकडे पाचशेच्या नोटा नाहीत.