शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 5:10 PM

बिंग फुटले : तिळवणच्या ग्रामसेवकाकडून मात्र सारवासारव

ठळक मुद्देग्रामपंचायतीने नवीन मिटरसाठी प्रस्ताव दिला असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले .

नाशिक : चोरुन वीज वापरुन आपला कार्यभाग उरकणाऱ्या गोष्टी महाराष्टला नवीन नाहीत परंतु, सरकारी यंत्रणेकडूनच चक्क आकडा टाकून आॅनलाइन लोकसेवा पुरविण्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील तिळवण ग्रामपालिकेत उघडकीस आला आहे. महावितरण कंपनीने सदर आकडा काढून ग्रामपालिकेचा विजपुरवठा खंडित केल्यानंतर तिळवण ग्रामस्थांची आॅनलाइन सेवेत बोळवण होऊ लागली तेव्हा या सा-या प्रकाराची बोंब झाली. मात्र, ग्रामसेवकाने आकडा टाकून वीज घेतली नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामस्थांना आॅनलाइन सेवा पुरविणा-या ग्रामपंचायतला स्वत:चे अधिकृत विज कनेक्शनच नसल्याचा धक्कादायक प्रकार तिळवन गावी बघायला मिळाला आहे. ग्रामस्थांकडूनच या प्रकाराची वाच्यता केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीचा विज पुरवठा खंडित केला असल्याची तक्रर  ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे आॅनलाइन सेवा ठप्प असल्याचेही ग्रामस्थानी सांगितले. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायतीने अधिकृत विज मिटरच घेतले नसून ग्रामपंचायत कार्यालयाजवळच असलेल्या विजेच्या खंबावर आकडा टाकून ग्रामपंचायतीचे काम बिनबोभाटपणे चालविले होते. सदर बाब उजेडात आली आणि ग्रामपंचायतीचे बिंग फुटले. विज वितरण कंपनीने आकडा काढून टाकल्याने ग्रामपंचयतची आॅनलाइन सेवा बंद पडली आहे . संगणक चालकाकडे असलेल्या लॅपटॉपवर कसे तरी काम सुरु असल्याची माहिती येथील पदाधिका-यांनी दिली. विशेष म्हणजे या सा-या प्रकाराची येथील ग्रामस्थ खुलेपणाने कबुली देत असताना ग्रामसेवक मात्र असला प्रकार झालाच नसल्याचे सांगत सारवासारव करत आहेत.महावितरणकडून कारवाई नाहीआकडा पकडला गेला असला तरी ग्रामपंचायतवर मात्र महावितरणने अद्याप कोणतीही करवाई झालेली नाही. तिळवण ग्रामपंचायतीची एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली असून सध्या नूतन पदाधिकारी कार्यरत आहेत . ग्रामपंचायतीने नवीन मिटरसाठी प्रस्ताव दिला असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले .आकडा टाकून वीज  नाहीग्रामपंचायतीने आकडा टाकून वीज पुरवठा घेतलेला नाही. पूर्वीचे जुने मिटर काढून नवीन मीटर बसविण्यात येणार आहे . एकच दिवस विज नव्हती .आता आॅनलाइनचे काम सुरु आहे .- शरद सोनवणे, ग्रामसेवक,तिळवण

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण