साकोरेत आॅनलाइन शिक्षण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:35 IST2020-08-05T22:51:06+5:302020-08-06T01:35:52+5:30

साकोरा : शाळा बंद; पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील साकोरे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद पार पडली. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच शाळा बंद आहेत. तरीही साकोरे केंद्रातील सर्व शिक्षक आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अध्यापनाचे कार्य करत आहेत.

Online Education Council in Sakore | साकोरेत आॅनलाइन शिक्षण परिषद

साकोरेत आॅनलाइन शिक्षण परिषद

ठळक मुद्देआॅनलाइन व आॅफलाइन शिक्षण माध्यमांचा आढावा घेण्यात आला.

साकोरा : शाळा बंद; पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील साकोरे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद पार पडली. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच शाळा बंद आहेत. तरीही साकोरे केंद्रातील सर्व शिक्षक आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अध्यापनाचे कार्य करत आहेत. याच उपक्रमांतर्गत साकोरे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद पार पडली. परिषदेसाठी नाशिक डायटचे अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंके, गटशिक्षणाधिकारी नंदा ठोके, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर सोनवणे व केंद्रप्रमुख शीला घुगे यांनी उपस्थित मार्गदर्शन केले. कोरोना काळात सर्वांचेच मानसिक आरोग्य बिघडले आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक व सामाजिक आरोग्य कशा प्रकारे स्थिर ठेवता येईल त्या उपायांवर माहिती व चर्चा करण्यात आली. आॅनलाइन व आॅफलाइन शिक्षण माध्यमांचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Online Education Council in Sakore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.