शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्न राष्टÑवादीकडून हायजॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:07 IST

नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र ...

ठळक मुद्देशेतकरी मतांकडे लक्ष; कांदा उत्पादक भागातच शरद पवार यांच्या सभांचे नियोजन

नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यातबंदी उठविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असतानाच, दरदिवशी कांद्याचे गडगडत असलेले दर लक्षात घेता राष्ट्रवादीने नाशिक जिल्ह्याच्या प्रचारात कांद्याची निर्यातबंदी व कोसळणाºया दराचा मुद्दाच प्रचारात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या दौºयावर येत असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन कांदा पिकविणाºया तालुक्यातच करण्यात आले आहे.निवडणुका कोणत्याही असल्या तरी, प्रत्येक निवडणुकीत कांद्याचे चढलेले वा गडगडलेले दर हे सत्ताधारी व विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांद्याने पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत दर खाल्ल्यानंतर खुल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने विक्री केला गेला. परिणामी देशपातळीवर सरकारच्या विरोधात ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात करताच, केंद्र सरकारने तातडीने पथक पाठवून कांदा भाववाढीची कारणे जाणून घेतली व तत्काळ कांद्यावर निर्यांतबंदी लादून व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली.परिणामी त्यानंतर कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याची निर्यातबंदी लादून ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्तारूढांनी चालविला असतानाच, दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकºयांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. आजही गावोगावच्या कांदा उत्पादकांमध्ये सरकारच्या निर्णयाविरुद्ध नाराजी असून, व्यापाºयांवरही कांदा साठवणुकीवर निर्बंध असल्यामुळे त्यांनी कांद्याची खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे कांद्याचे दर चक्क दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरले आहेत. कांदा उत्पादकांच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिले आहे; परंतु त्यावर शेतकरी कितपत विश्वास ठेवतील ही शंकाच आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने हा मुद्दा निवडणूक प्रचारात अग्रक्रमाने आणला आहे.कांद्याचे राजकारण रंगण्याची चिन्हेनाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कांद्यासंदर्भात सरकारने घेतलेले निर्णय कामी आले असून, या आठवड्यात शरद पवार जिल्ह्याच्या दौºयावर येत असताना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येवला, निफाड व दिंडोरी अशा तीनच ठिकाणी पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु दिवसेंदिवस कांद्याच्या निर्यातबंदीमुळे कोसळत असलेले दर पाहता, कांदा उत्पादकांची सहानुभूती मिळविण्यासाठी आता कांद्याची बाजारपेठ असलेल्या उमराणे, चांदवड, पिंपळगाव बसवंत, नांदगाव या ठिकाणी शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. यातून कांद्याचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार