बाजारात कांद्याला ५२६१ रु पये प्रतिक्विंटल दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:14 IST2019-11-12T18:13:57+5:302019-11-12T18:14:21+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवारपर्यंत बाजारात ६०००ते ६१०० प्रतिक्विंटल असणाऱ्या चांगल्या कांदात सोमवारी २०० रुपयांची घसरण होऊन ५९०० रु पर्यंत गेला.

बाजारात कांद्याला ५२६१ रु पये प्रतिक्विंटल दर
पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवारपर्यंत बाजारात ६०००ते ६१०० प्रतिक्विंटल असणाऱ्या चांगल्या कांदात सोमवारी २०० रुपयांची घसरण होऊन ५९०० रु पर्यंत गेला.
मंगळवारी (दि १२)कांद्याच्या भावात कमालीची घसरण होत ६३९ रुपये दराची घसरण झाली आहे. कांद्याच्या मागणीत घट होत असल्याने हे कांद्याचे भाव दर दोन दिवसांनी कमी जास्त होत असल्याची परिस्थिती बाजारात आहे. येत्या आठवडाभरात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे शंभरी गाठण्याच्या स्थितीत असणाºया कांद्याला ब्रेक लागणार का ? की, अजून लाली आणणार हे शिल्लक आलेल्या व नव्यानं दाखल होणाºया लाल कांद्यावरच अवलंबून आहे.
शेतात लावलेला कांदा बाहेर काढण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात अपेक्षीत असलेला कांदा बाजारात येऊच शकलेला नाही. जो काही नवीन कांदा बाजारात येण्यास सुरु वात झाली आहे, तो कांदा ओलाच असून पूर्णपणे पाण्यात भिजलेला आहे. हा कांदा सुकवून बाजारात पाठवू शकत नाही तसेच, बाजारात आलेला हा ओला कांदा टिकेल, अशी परिस्थितीही नाही. त्यामुळे बाजारात चांगला सुका, जुना कांदा फारच कमी प्रमाणात येत आहे. जो काही येत आहे, त्याला मागणी असल्याने त्याच्या दरात दर दोन दिवसांनी चढउतार होत आहे.
मागील मिहन्यात ४० रुपये किलोपर्यंत असलेला हा उन्हाळ कांदा बाजारात शनिवारी ५०६१ रुपये प्रतिक्विंटलचा दर सोमवारी ५९०० रु पये होता तर यात मंगळवारी ६३९ रु पयांची घसरण होऊन ५२६१ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्र ी झाला आहे.
बाजारात चांगल्या कांद्याला ५० ते ५२ रुपये किलोचा दर मिळत असल्याने बाजारात येणाºया नवीन ओल्या आणि खराब होत जाणाºया कांद्यालाही बाजारात ३० ते ४० रु पये किलोचा दर मिळत आहे. मात्र हा कांदा साठवून ठेवण्यासारखा नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडूनच हा कांदा खरेदी केला जात आहे आणि घरगुती वापरासाठी ग्राहक जुना कांदा खरेदी करणे पसंत करत आहेत.