शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

इजिप्त अन‌् तुर्कस्तानचा कांदा नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 11:54 PM

पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांचा ऐन दिवाळीत वांदा केला असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बाजार समिती : राज्यातील शेतकरी चिंतित

गणेश शेवरेपिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांचा ऐन दिवाळीत वांदा केला असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यासह देशातील बेंगलोर, इंदूर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र अवकाळी पावसाने लाल कांद्याच्या पिकाची मोठी नासाडी झाल्याने लाल कांद्याचे आगमन लांबले, परिणामी मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे पोहोचले. आता केंद्र शासनाने थेट तुर्की, इजिप्तच्या कांद्याची आयात केल्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे.शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत दाखल झालेल्या तुर्कीच्या कांद्याला सरासरी दीड हजार रुपये, तर स्थानिक कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तुर्कीचा कांदा दरावर दबाव आणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तुर्कस्थानचा कांदा बेचव....तुर्कस्थानचा कांदा शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे बाजार घसरण दिसली. गतवर्षी हा कांदा भारतात आला होता. पण उग्र वास, बेचव होता. चवीला समाधानकारक नसल्याने तुर्कीच्या कांद्याकडे नागरिक पाठ फिरवतील, असे सांगितले जात आहे.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्रीसाठी आलेला तुर्कस्थानचा कांदा.उन्हाळ कांदा- कांदा : क. कमी- १९००, जा. जास्त- ५७००, सरासरी- ४२५१.- गोल्टी : क. कमी- १०००, जा. जास्त- ३४९०, सरासरी- ३२००.- खाद : क.कमी-५००, जा. जास्त-२४०१, सरासरी-१७०१.लाल कांद्याचे दर- कांदा : क. कमी-२००१, जा. जास्त-५५००, सरासरी-४३०१.- गोल्टी : क. कमी-५००, जा. जास्त २९२०, सरासरी-२५५१.

बाहेरून कांदा आयत करून कांदा उत्पादकांचा केला घात.....महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या पिकाची मोठी नासाडी झाली. त्यामुळे लाल कांद्याचे आगमन लांबल्याने मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. हे दर वाढतच असल्याने त्या कांद्याच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र शासनाने स्थानिक शेतकऱ्यांचा घात करत थेट तुर्की, इजिप्तच्या कांद्याची आयात केली. 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा