अंदरसूल : येथे अचानक लागलेल्या आगीत कांदा चाळ खाक होऊन दोन शेतकऱ्यांचे एकूण एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले.येथील शेतजमीन मालक शिवनाथ पुंजाप्पा गाडे व विश्वनाथ पुंजाप्पा गाडे यांच्या मालकीच्या शेतातील चारा व कांदा रिकामी चाळ, चिंचेचे झाड हे अचानक लागलेल्या आगीत खाक झाले. चिंचेचे झाड व कांद्याची रिकामी चाळ खाक झालेल्या शिवनाथ पुंजाप्पा गाडे यांची ऐंशी हजार व विश्वनाथ पुंजाप्पा गाडे यांची चाळीस हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. एकाच वेळेस लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. गावातील व परिसरातील नागरिकांनी गावालगत असलेल्या या शेताकडे धाव घेऊन गर्दी केली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}