केन्द्र शासनाच्या धोरणामुळे कांदा खरेदी विक्री व्यवहार प्रणाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 08:36 PM2020-10-26T20:36:35+5:302020-10-27T00:32:52+5:30

वणी : कांद्याचे दर नियंत्रणात करण्यासाठी कांदा व्यापारी यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उपबाजारातील व्यवहार ठप्प झाले होते.

Onion buying and selling system stalled due to central government's policy | केन्द्र शासनाच्या धोरणामुळे कांदा खरेदी विक्री व्यवहार प्रणाली ठप्प

केन्द्र शासनाच्या धोरणामुळे कांदा खरेदी विक्री व्यवहार प्रणाली ठप्प

Next
ठळक मुद्देकांद्याच्या दरातील तेजीमुळे ईतर पिकांचे झालेले नुकसान

वणी : कांद्याचे दर नियंत्रणात करण्यासाठी कांदा व्यापारी यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उपबाजारातील व्यवहार ठप्प झाले होते.

गेल्या काही दिवसांपासुन कांद्याचे दराबाबत ओरड सुरु झाली होती.वास्तविक परतीच्या पावसाने मोठ्या नुकसानीचा तडाखा शेतकर्यांना पावसाने दिला आहे.अनेक पिकाःची वाताहात झाली आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्याला काही अंशी कांद्याने साथ दिल्याने मंदीचे मळभ दुर झाले होते.

कांद्याच्या दरातील तेजीमुळे ईतर पिकांचे झालेले नुकसान विस्मरणात जाण्यापुर्वीच कांदा दर वाढल्याचे कारण पुढे करत सरकारने कांदा व्यापार्यांनी साठवणुक कांद्यावर नियमावलीचे अस्त्र सोडले निश्चित साठ्यापुढे कांदा साठवणुक करु नयेअसे फर्माण निघाले. धास्ती घेतलेल्या व्यापार्याःनी कांदा खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने उत्पादकही अडचणीत आले व उपबाजारातील व्यवहार आजठप्प झाले त्यामुळे कांदा खरेदी विक्री च्या व्यवहारप्रणालीला ग्रहण लागले.या निर्णयामुळे उत्पादकामधे नाराजी तर शेतकर्यामधेअस्वस्थतेचे वातावरण आहे.

 

Web Title: Onion buying and selling system stalled due to central government's policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.