अभोणा उपबाजारात कांदा लिलाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:21 IST2021-04-05T20:05:38+5:302021-04-06T00:21:22+5:30
अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात सोमवार (दि.५) पासून उन्हाळ कांदा खरेदी लिलावास समिती संचालक ज्ञानदेव पवार,देवेंद्र गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत कांदा व्यापारी असोसिएशन प्रमुख मनोहर पवार यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी खरेदीदार व्यापारी गणेश निकम,योगेश सिरसाठ, रमाकांत देशमुख, आबा पाळेकर, विकी पाटील, वसीम मनीयार, युवराज पवार, वसंत निकम, जाकीरशेट, इस्माईल तांबोळी, मोहन जाधव, नीलेश पाटील, शिवा निकम, विकी जाधव, तेजस पाटील, ज्ञानेश वेढणे, अनिल आहेरराव यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत झालेल्या लिलावात १७३ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३५०० क्विंटल आवक होऊन कमाल १हजार २०५ रुपये किमान चारशे रुपये तर सरासरी ९०० ते ९५० रुपये भाव मिळाल्याची माहिती सचिव रवींद्र पवार, विशाल वाघ यांनी दिली.