Onion auction starts in 4 days in Lasalgaon; Positive settlement on mediation of Sharad Pawar | ४ दिवसांनी लासलगावात कांदा लिलाव सुरू; शरद पवारांच्या मध्यस्थीनं सकारात्मक तोडगा

४ दिवसांनी लासलगावात कांदा लिलाव सुरू; शरद पवारांच्या मध्यस्थीनं सकारात्मक तोडगा

लासलगाव (नाशिक) : चार दिवसांनी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आज शुक्रवारी सकाळी पुर्ववत सुरू झाले. सकाळी फक्त 50 वाहनातील 600 क्विंटल उन्हाळ कांदा विक्रीस आला असुन कांदा भावात कोणताही बदल न होत पाच दिवसापूर्वी लिलावात जाहीर झालेला सर्वाधिक कांदा भाव 5900 रूपये जाहीर झाला. तर लाल कांदा आवक अजिबात झालेली नाही . सकाळी 1500 ते 5900 रूपये व सरासरी 5100 रूपये भाव जाहिर झाला.

लिलाव दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू झाले असल्याची माहीती लासलगाव  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.लिलाव पूर्ववत सकाळी 09.00 ते 12.00 व दुपारी 03.30 ते लिलावाचे कामकाज संपेपर्यंत चालू राहतील. तसेच कांदा खरेदीचे लिलाव सकाळी 08.00 वाजता सुरू होतील. असे बाजार समितीचेवतीने कळविण्यात आले आहे. विंचुर येथे 1500 ते 6351 व सरासरी रूपये 5300 रूपये भाव मिळाला आहे. 

जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख 15 कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव  सलग चार दिवसांपासून बंद  होते . कांद्याचे लिलाव बंद असल्यानं चार दिवसांत 100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होते. दिपावली सणाचे खरेदीकरीता हा कालावधी  कांदा अगर शेतीमाल विक्रीकरीता महत्वाचा असतो. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती. काल राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत व्यापारी व शेतकरी यांनी बैठक घेतली.त्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेऊन मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे  बैठक झाली.राज्य सरकारने कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचेबाबात केद्र सरकारकडे मुख्यमंत्री लक्ष घालणार आहेत.सकारात्मक चर्चा झाल्याने गेली चार दिवस सुरू असलेली कांदा लिलाव बंदची कोंडी सुटली आहे.

Web Title: Onion auction starts in 4 days in Lasalgaon; Positive settlement on mediation of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.