शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लिलाव बेमुदत बंद

By admin | Updated: November 15, 2016 01:43 IST

चलनाचा अभाव : लासलगावी कांदा, तर निफाडला शेतमाल पडून

लासलगाव : येथील मुख्य आवारावरील कांदा व धान्य तसेच विंचूर व निफाड उपबाजार आवारावरील धान्य शेतमालाचे लिलाव व्यापाऱ्यांनी चलन उपलब्धता नसल्याने सहभागी होणार नाही, असे पत्र व्यापारी संघटनांनी दिल्याने पुढील सूचना येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. मात्र लासलगाव येथील भाजीपाला तसेच निफाड उपबाजार आवारावरील कांदा लिलाव होणार असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीचे चलन पुरवठा होण्यासाठी अडचण निर्माण झाली. यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होणार नसल्याचे लासलगाव येथील मर्चंट्स असोसिएशनने कळविले. त्यामुळे मंगळवारपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद होते. परंतु सोमवारी सायंकाळी दिलेल्या पत्रानुसार आता बेमुदत लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केल्याने त्याचे पडसादही उमटायला सुरु वात झाली आहे. या निर्णयामुळे गुरुवार ते मंगळवारपर्यंत लिलाव बंद राहिले आहेत. (वार्ताहर)