शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ फ्रेंड्स सर्कलतर्फे ‘एक मूठ धान्य’

By admin | Updated: September 27, 2016 00:29 IST

कळवण : कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना वाटप

कळवण : येथील समर्थ फ्रेंड्स सर्कलतर्फे शहरात गणेशोत्सव कालावधीत ‘एक मूठ धान्य’ उपक्र म राबविण्यात आला. या उपक्र मात जमा झालेले धान्य कळवण तालुक्यातील कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळे लाईटिंग, देखावा, मिरवणूक, आतषबाजी आदिंवर हजारो, लाखो रुपये खर्च करतात; मात्र कळवण येथील समर्थ फ्रेंड्स सर्कलने या सर्व बाबींना फाटा देऊन कळवण शहरात गणेशोत्सव काळात गणेश मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शहरातील गणेश मंडळे व प्रतिष्ठित नागरिकांकडे जाऊन स्वेच्छेने धान्य भिक्षा देण्याचे आवाहन केले. त्यातून ८ क्विंटल गहू, ८ क्विंटल तांदूळ, २ क्विंटल बाजरी, २ डबे तेल, २० किलो डाळी, १० किलो चहा पावडर, ५० किलो साखर इत्यादि साहित्य जमा करण्यात आले. या सर्व जीवनावश्यक वस्तू कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या हस्ते कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात आल्या. यावेळी अभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फुला, सुनील चव्हाण, बबन पाटोळे, समर्थ फ्रेंड्स सर्कलचे स्वप्नील शिरोरे, सागर वाणी, पुष्कर वेढणे, रोहित महाले, मयूर अमृतकार, रोशन कोठावदे, हर्षल मालपुरे, उमेश मुसळे, सचिन गहिवाळ, कल्पेश पाखले, दामोदर अमृतकार, सुभाष देवघरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)सार्वजनिक उत्सव जरूर साजरे करावेत; मात्र यावेळी अनावश्यक खर्च टाळून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने शक्य तेवढी मदत समाजातील उपेक्षित व गरजू घटकांना करणे ही काळाची गरज आहे. असे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळ सस्थांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. - सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक, कळवणमागील दोन वर्षांपूर्वी आपल्या समर्थ फ्रेंड सर्कलने असाच अभिनव उपक्र म राबविला होता. त्यावर्षी २५ क्विंटल धान्य जमा झाले. तसेच यावर्षीही जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व मोलाचे सहकार्य केले.- स्वप्नील शिरोरे, समर्थ फ्रेंड सर्कल, कळवण