एकलहरेत ‘आयुष्यमान योजने’ला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:50 IST2019-01-13T22:35:51+5:302019-01-14T00:50:41+5:30
एकलहरे येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली.

एकलहरे सिद्धार्थनगर येथे ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे. सोबत मान्यवर.
एकलहरे : येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली.
एकलहरे गटातील जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवस्थापक महेश कोलते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, लकी ढोकणे, भास्कर जगताप, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सरकार सेवा (डिजिटल इंडिया) लाभार्थ्यांचे नावे शोधण्याचे आवाहन करण्यात
आले.
या योजनेचा लाभ एकलहरे वसाहत, गंगावाडी, सिद्धार्थनगर, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढा, एकलहरेगाव येथील नागरिकांनी मिळणार आहे.