दुचाकी घसरून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:36 IST2020-05-14T23:35:42+5:302020-05-14T23:36:52+5:30
भरधाव दुचाकी घसरून युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्टरोडवर घडली.

दुचाकी घसरून एक ठार
नाशिक : भरधाव दुचाकी घसरून युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्टरोडवर घडली.प्रभाकर चुडामन शिंदे (रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, सातपूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे हा मेहर सिग्नलकडून सिबिएसकडे जात असताना त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळून तो खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून गेले. त्यांनी त्यास नागरिकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.