दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST2021-01-13T04:33:12+5:302021-01-13T04:33:12+5:30

तारनाथ पोपट निकम (४०, रा. आघार) या पिकअप चालकाने फिर्याद दिली. फिर्यादी निकम हे त्यांच्या बहिणीचे सासरे विजय बुवाजी ...

One killed in a two-wheeler accident | दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार

दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार

तारनाथ पोपट निकम (४०, रा. आघार) या पिकअप चालकाने फिर्याद दिली. फिर्यादी निकम हे त्यांच्या बहिणीचे सासरे विजय बुवाजी पवार (५७, रा. पिंपळगाव) यांच्यासह दुचाकीने (क्र. एमएच ४१ एल ६२१०) पिंपळगावहून रावळगावकडे जात होते. पिंपळगाव शिवारात पाठीमागून आलेल्या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एडी ६८३६) त्यांना धडक दिली. यात विजय पवार यांचा छातीस गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित दुचाकीचालक पसार झाला. अधिक तपास हवालदार बी. पी. राऊत करीत आहेत.

-----

वडेल - डाबली रस्त्यावर अपघातात दोन जखमी

मालेगाव : तालुक्यातील वडेल - डाबली रस्त्यावर डाबली शिवारात भरधाव दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला कट दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. गेल्या रविवारी सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. मधुकर श्रावण देवरे, रा. डाबली यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ४१ एक्यू १५४२) भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १२ सीक्यू २३३१) कट दिल्याने झालेल्या अपघातात फिर्यादीसह पाठीमागे बसलेले शिवराम बापू अहिरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. खबर न संशयित दुचाकीचालक पळून गेला. अधिक तपास जमादार एस. आर. पवार करीत आहेत.

Web Title: One killed in a two-wheeler accident