मोटारसायकल अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:16 IST2019-03-15T00:15:15+5:302019-03-15T00:16:33+5:30

चांदवड तालुक्यातील भडाणे (भारतनगर) शिवारात गुरु वारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

One killed, two injured in motorcycle accident | मोटारसायकल अपघातात एक ठार, दोन जखमी

मोटारसायकल अपघातात एक ठार, दोन जखमी

चांदवड : तालुक्यातील भडाणे (भारतनगर) शिवारात गुरु वारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
याबाबत भडाणेचे पोलीसपाटील सागर भिका अहेर यांनी चांदवड पोलीस ठाण्याला खबर दिली. चांदवड - लासलगाव रोडवरील भडाणे शिवारात मोटारसायकल क्र. एमएच ४१ एडब्ल्यू ४९५६ व एमएच १५ जीक्यू २३११ यांची समोरासमोर धडक होऊन त्यात दत्तात्रय यादव बोरके (२७) रा. कातरगाव, ता. निफाड हे जागीच ठार झाले तर बबन दत्तूू उगले (५०) रा. कातरगाव व राहुल दिलीप आवारे (२५) रा. सावकारवाडी, ता. मालेगाव हे गंभीर जखमी झाले. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास नरेश सौंदाणे करीत आहेत.

Web Title: One killed, two injured in motorcycle accident