ट्रक-कार अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 21:05 IST2020-04-04T21:04:15+5:302020-04-04T21:05:06+5:30
देवळा : खुंटेवाडी फाटयाजवळील वळणावर घडली घटना देवळा : येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात शनिवार दि. 4 रोजी अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ट्रक-कार अपघातात एक ठार
देवळा : येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात शनिवार दि. 4 रोजी अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रेशनिंगचे धान्य सटाणा येथे पोहोचवून दुपारी मनमाडकडे परत जाणारा ट्रक (एमएच १२ एफझेड ५८५८) व पिंपळगाव (वा.) कडून येणारी स्विफ्ट कार (एमएच १५ जीएक्स ८४५६) यांचा खुंटेवाडी फाटा जवळील वळणावर कट लागल्याने अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने चालक धनराज कारभारी गायकवाड रा. मनमाड (५५) याचा मृत्यू झाला, तर ट्रकमधील गोरख मधुकर थोरे रा. मनमाड व स्विफ्ट कार मधील प्रतिभा चेतन छाजेड रा. वडाळीभोई असे दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत रस्ता मोकळा असल्याने वाहने जोरात असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. (फोटो ०४ देवळा)