पेठरोडला वाहनाच्या धडकेने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:18 AM2020-07-06T00:18:01+5:302020-07-06T00:18:26+5:30

पेठरोडला म्हसरूळ रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.

One killed in a road accident on Peth Road | पेठरोडला वाहनाच्या धडकेने एक ठार

पेठरोडला वाहनाच्या धडकेने एक ठार

Next

पंचवटी : पेठरोडला म्हसरूळ रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
पेठरोड मनपा कमान जवळ हा अपघात घडला. या अपघातात जेलरोड येथील अंगद सुभाष जोशी ठार झाला. याबाबत मयत जोशी यांचे बंधू अभिषेक जोशी यांनी तक्र ार दाखल केली आहे. शनिवारी (दि.४) जोशी यांचा भाऊ अंगद व त्याचे मित्र नीलेश बेंडकुळे व भूषण असे तिघेजण दुचाकीवरून पेठरोडने नाशिक दिशेला येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तिघे खाली पडले, त्यात जोशी याला गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

Web Title: One killed in a road accident on Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.