गोळशी फाट्यानजीक अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:21 AM2019-08-04T01:21:33+5:302019-08-04T01:21:52+5:30

दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्यानजीक शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल नंदिनीजवळ झालेल्या अपघातात फोफळवाडेचे पोलीसपाटील ठार झाल्याची घटना घडली आहे.

One killed in Golshi Fatanjik accident | गोळशी फाट्यानजीक अपघातात एक ठार

गोळशी फाट्यानजीक अपघातात एक ठार

Next

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्यानजीक शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल नंदिनीजवळ झालेल्या अपघातात फोफळवाडेचे पोलीसपाटील ठार झाल्याची घटना घडली आहे. पेठकडून गोळशी फाट्याकडे जाणाऱ्या बजाज सिटी दुचाकीला (क्र. एमएच १५ एफबी ३२८९) गुजरात परिवहन महामंडळाच्या बसने समोरून जोरदार धडक दिली. यात फोफळवाडे येथील पोलीसपाटील मनोहर लिलके (४५) जागीच ठार झाले. माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, शिलावट यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामाला केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात पाठविला आहे. बससह चालक फरार असून, दिंडोरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One killed in Golshi Fatanjik accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.