विल्होळीजवळील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:36 IST2019-03-17T00:35:58+5:302019-03-17T00:36:53+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी जुना नाका परिसरात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

विल्होळीजवळील अपघातात एक ठार
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी जुना नाका परिसरात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक कडे जात असताना जातेगाव येथील दुचाकीस्वार गणेश महादेव शिंदे (३२) याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. गणेश शिंदे एमएच १५ सीएन ९८३३ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना विल्होळी जुना नाक्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिंदे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघातानंतर वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे पुढील तपास करीत आहे.