नाशिक-येवला मार्गावर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:22 IST2019-05-29T23:56:51+5:302019-05-30T00:22:51+5:30
नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे.

नाशिक-येवला मार्गावर अपघातात एक ठार
येवला : नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२८) रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
बालाजी चिप्स कंपनीचा कंटेनर (क्र.एमएच ०४ जेके ७४६३) हा बलसाड येथून नांदेडकडे जात होता. येवला तालुक्यातील रायते शिवारात चालक रस्त्याच्या कडेला कंटेनर घेत असताना मागून आलेली डस्टर कारच्या (क्र.एमएच १५ इबी ७८८६) चालकाला कंटेनरचा अंदाज न आल्याने कार कंटेनरवर जाऊन धडकली. डस्टरमधील तीनपैकी विलास सर्जेराव वावधने (वय ४२ ), रा. मानोरी खुर्द, ता. निफाड यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे सुनिल कारभारी वावधने व नितीन बाळासाहेब पगारे हे गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथील
रुग्णालयात दाखल केले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.जे.मोरे पुढील तपास करीत आहेत.