घोड्याने लाथ मारल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:06 IST2021-08-16T23:06:03+5:302021-08-16T23:06:47+5:30
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी शिवारात येथे घोड्याने लाथ मारल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. फकिरा भाऊसाहेब गोंधळे (५५) रा. धनगरवाडी ता. सिन्नर असे मयत मजुराचे नाव आहे.

घोड्याने लाथ मारल्याने एकाचा मृत्यू
ठळक मुद्देफकिरा भाऊसाहेब गोंधळे मयत मजुराचे नाव.
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी शिवारात येथे घोड्याने लाथ मारल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. फकिरा भाऊसाहेब गोंधळे (५५) रा. धनगरवाडी ता. सिन्नर असे मयत मजुराचे नाव आहे.
वडांगळी-तामसवाडी शिवारात एका मालकाकडे घोडा आहे. मजुराने पाठीमागून आल्यानंतर घोड्याने जोरदार त्याच्या पोटात व छातीत लाथ मारली. पोटात गंभीर दुखापत झाल्याने फकीरा भाऊसाहेब गोंधळे यांना सिन्नर आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार नंदू कुऱ्हाडे अधिक तपास करीत आहेत.