Omicron Variant : ओमायक्रॉनचा धसका! प्रवाशाचा मास्क नसेल तर वाहनचालकालाही हाेणार दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:38 IST2021-12-08T15:37:48+5:302021-12-08T15:38:26+5:30
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे आता महाराष्ट्रातही रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात असा विषाणू दारावर असतानाच शासनाने अनेक निर्णय घेतले ...

Omicron Variant : ओमायक्रॉनचा धसका! प्रवाशाचा मास्क नसेल तर वाहनचालकालाही हाेणार दंड
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे आता महाराष्ट्रातही रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात असा विषाणू दारावर असतानाच शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. बाजारपेठेत आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याने आता दुकानात विनामास्क ग्राहक दिसला तर व्यापाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रिक्षा किंवा अन्य प्रवासी वाहनात बसलेल्या प्रवाशाने मास्क घातला नाही तर रिक्षा, बस चालक किंवा तत्सम प्रवासी वाहन चालवणाऱ्यांना दंड करण्यात येेणार आहे. महापालिकेच्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असली तरी प्रवासी वाहनचालकांवर मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यातील एकूण प्रवासी वाहने
कार/जीप- २,६२,२६५
टॅक्सी- ६,७७२
ऑटो रिक्षा- २७,७९६
आठवडाभरात अवघे १३ हजार रुपयांचा दंड वसूल
- नाशिक महापालिकेच्यावतीने स्वच्छता निरीक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र जेमतेम कारवाई सुरू आहे.
- कोरोनाच्या दोन लाटेत महापालिकेपेक्षा अधिक दंड वसूल करणाऱ्या पोलिसांनी हात आखडता घेतला आहे.
१३००० चालू आठवड्यातील दंड वसूल
नाशिक महापालिका आणि पोलिसांची दंडात्मक कारवाई थंडावली आहे. केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहनचालकांचे कर्मचारी जुमानत नाहीत आणि पोलीस साथ देत नाहीत. त्यामुळे गेल्या आठवडाभरात केवळ २२ नागरिकांना १३ हजार रुपयांचाच दंड वसूल करण्यात आला आहे.