अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:41 IST2025-11-04T18:40:18+5:302025-11-04T18:41:29+5:30
Nashik News: गेमिंग झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करून लोखंडी हातोडा त्याच्या नाकावर मारला.

अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
Nashik Crime: मखमलाबाद रस्ता असलेल्या बॉलिंग ॲलिक झोनमध्ये खेळण्यासाठी आलेल्या एका युवकाने व त्याच्या अन्य साथीदारांनी पॉइंट वाढल्याने त्याने राग मनात धरून गेमिंग झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करून खेळण्यातील लोखंडी हातोडा त्याच्या नाकावर मारून नाक फोडल्याची घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी बॉलिंग ॲलिक झोनमध्ये काही युवक खेळण्यासाठी आलेले होते. त्यावेळी गेमिंग खेळताना एका युवकाचे पॉइंट वाढले. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने हे पॉईंट चुकीच्या पद्धतीने वाढल्याचा आरोप करत येथील कर्मचारी अतुल अशोक भाकरे (रा. गंगापूररोड) याला जाब विचारला.
यावेळी त्याच्यासोबत असलेले त्याचे साथीदारही धावून आले. त्यांनी भाकरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हातोडा नाकावर मारल्याने नाक फुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.