शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची वानवा

By admin | Updated: December 31, 2016 01:05 IST

निवडणूक तयारी : परजिल्ह्याची लागेल मदत

नाशिक : तोंडावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांना दिल्या असल्या तरी, अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना घालून दिलेले निकष पाहता नाशिक जिल्ह्यात अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाल्याने त्यासाठी परजिल्ह्याची मदत घ्यावी लागणार आहे.  राज्य आयोगाने काढलेल्या या आदेशात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जावी असे नमूद करण्यात आले असून, अधिकाऱ्यांची कमतरता असेल तर विभागीय आयुक्तांनी अन्य जिल्ह्यांतून असे अधिकारी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य जिल्ह्यांत अधिकारी नसतील तर इतर महापालिकेतील उपआयुक्तांची नेमणूक करण्यात यावी असा पर्याय राज्य आयोगाने खुला ठेवला आहे; मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकारी नेमताना त्यासाठी निकषही घालून दिले आहेत.
स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करू नये त्याचबरोबर तीन वर्षांपासून एकाच पदावर व जिल्ह्यात चार वर्षे सेवा झालेल्या अधिकाऱ्यांनाही नियुक्त करू नये अशा सक्त सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या निकषाचे पालन करून निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करणे मोठी तारेवरची कसरत होणार असून, गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका करतानाच, प्रतिनियुक्तीवरील उपजिल्हाधिकारी तसेच पर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करून टाकल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेसाठी निवडणूक अधिकारी नेमण्यासाठी जिल्ह्यात अधिकारीच उपलब्ध नाहीत, परिणामी अन्य जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)