गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:53 IST2018-11-17T00:53:12+5:302018-11-17T00:53:27+5:30
गावठी कट्टासोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा
नाशिक : गावठी कट्टासोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़ सिध्देश मनोज जोंधळे (२५, रा.तारा निवास, स्वामीनगर टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पाथर्डीफाटा परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक संशयित गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयित जोंधळे यास अटक केली़ त्याची झडती घेतली असता लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.